बुलडाणा (घाटावर)

सेनापती घायाळ! जिल्हा मुख्यालयातील 100 ‘मावळ्यांची’चाचणी!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा प्रशासनाचा अर्धाधिक भार सांभाळणारे व कोरोना प्रतिबंधक लढाईतील समनवयक निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय हादरले आहे! यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून जिल्हा कचेरीमधील 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी हे पद समन्वयाचे असल्याने ते अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या संपर्कात येणे स्वाभाविक ठरते. यामुळे त्यांनीही चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. तसेच दक्षता म्हणून व रुटीन कार्यक्रम म्हणून आज, 20  एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कमीअधिक 100 अधिकारी व कर्मचारी यांचे आरटीपीसीआर पद्धतीने चाचणीसाठी स्वॅब नमुने घेण्यात आले. आरोग्य विभागाच्या सुमारे 4 कर्मचाऱ्यांनी हे नमुने घेतले. टेस्ट किट संपल्याने उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गुरुवारच्या मुहूर्तावर नमुने घेण्यात येतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: