चंदेरी

सोनाक्षीनं घेतलं नवं घरं!

अभिनेत्री आलिया भट्ट, हृतिक रोशन, जान्हवी कपूर या कलाकरांनी नव्या वर्षाच्या मुहूर्तावर नव्या घरात पदार्पण केल्याची गोड बातमी असतानाच आता त्यांच्या यादीत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचाही समावेश करावा लागेल. सोनाक्षीनेही नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
मुंबईतील वांद्रे येथे 4 बीएचके अपार्टमेंट सोनाक्षीने खरेदी केलं आहे. सोनाक्षी सांगते, की जेव्हापासून मी करिअरला सुरुवात केली तेव्हापासून एकच स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत मला माझं हक्काचं, स्वत:चं घर खरेदी करायचं होतं. मला माझ्या कष्टाच्याच पैशांमध्ये हे घर खरेदी करायचं होतं. तसं मला बराच वेळ लागला आहे. पण अखेरकार माझं स्वप्न साकार झालं आहे, अशा भावना गृहप्रवेश करताना सोनाक्षीने व्यक्त केल्या. मी नवीन घर घेतलं असलं तरी माझ्या आई- वडिलांसोबतच राहणार आहे. मला आई- वडिलांसोबत रहायला जास्त आवडतं. जुहूतील घर सोडून जाण्याचा माझा कोणताच विचार नाही. मला केवळ माझं हक्काचं घर खरेदी करायचं होतं. ते मी केलं आहे आणि हीच माझी खरी गुंतवणूक आहे, असे सोनाक्षी म्हणाली. सोनाक्षीचा लवकरच भूज : द प्राइड ऑफ इंडिया हा चित्रपट पडद्यावर येत असून, यात ती अभिनेता अजय देवगणसोबत दिसणार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: