बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

सोनाळा, पातुर्ड्यात कोरोनाचे रुग्‍ण!; लाट ओसरतेय…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे काल, १६ ऑगस्‍टला दोन रुग्‍ण समोर आले. हे दोन्‍ही रुग्‍ण संग्रामपूर तालुक्‍यातील असून, सोनाळा आणि पातुर्ड्यात ते आढळले. दिवसभरात १० रुग्‍णांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या ३३ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. १३७७ नमुने तपासणीस घेऊनही अवघे दोन पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आल्याने कोरोनाची लाट ओसरत चालल्याचे दिसत आहे. कालपर्यंत ६ लाख ६८ हजार ३२० अहवाल निगेटिव्‍ह प्राप्‍त झाले असून, ८६ हजार ६५१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांचा आकडा कालपर्यंत ८७ हजार ३५६ होता, तर मृतकांचा आकडा ६७२ होता, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: