सोन्याच्‍या गिन्न्या प्रकरणातील आरोपीला ‘कोरोना’ पावला… क्‍वारंटाइन सेंटरमधून पोलीस, सिक्‍युरिटी गार्डना चकमा देऊन पलायन!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ःबुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अर्धा किलो सोन्याच्या गिन्न्या 20 लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवून पुण्याहून बोलावलेल्या तिघांना अंत्रज (ता. खामगाव) येथे मारहाण करून त्यांच्याकडील15 लाख रुपये घेऊन पिटाळण्यात आले होते. या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी 6 मे रोजी पहाटे दीडशेवर पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्त्वात विशेष मोहीम आखून 25 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून …
 

खामगाव (भागवत राऊत ःबुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अर्धा किलो सोन्‍याच्‍या गिन्न्या 20 लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवून पुण्याहून बोलावलेल्या तिघांना अंत्रज (ता. खामगाव) येथे मारहाण करून त्‍यांच्‍याकडील15 लाख रुपये घेऊन पिटाळण्यात आले होते. या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी 6 मे रोजी पहाटे दीडशेवर पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्‍या नेतृत्त्वात विशेष मोहीम आखून 25 जणांना ताब्‍यात घेतले होते. त्‍यांच्‍याकडून 31 लाख 79 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यातील एका आरोपीला कोरोना झाल्‍याने क्‍वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तो पळून गेला आहे.

विशाल मनीराम चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्‍याने त्‍याची 9 मे रोजी खामगाव येथील सामान्य रुग्‍णालयात रॅपिड टेस्‍ट करण्यात आली. त्‍यात तो पॉझिटिव्‍ह आढळला. त्‍यामुळे त्‍याला उपचारासाठी खामगाव येथील घाटपुरी रोडवरील क्‍वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. थोड्यावेळाने डॉक्टर तेथे आरोपीची तपासणी करण्याकरिता आले असता तो क्‍वारंटाइन सेंटरमधून पळून गेल्याचे दिसून आले. सेंटरवर पोलीस व सिक्युरिटी गार्ड होते. त्‍यांना चकमा देण्यात तो यशस्वी झाला. पोलीस नाईक शैलेश राजपूत यांच्‍या तक्रारीवरून त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. त्‍याचा शोध घेतला जात आहे.