क्राईम डायरी

सोबत नांदत नाही म्‍हणून पत्‍नीसह सासऱ्यालाही बेदम मारहाण! मोताळा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पत्‍नी सोबत नांदत नाही म्हणून सासऱ्यासह पत्‍नीला मारहाण करण्यात आली. ही घटना अंत्री (ता. मोताळा) येथे 29 मार्चला घडली. याप्रकरणी  बोराखेडी पोलीस ठाण्यात जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण गोविंदा गवई (60, रा. अंत्री ता. मोताळा) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी म्हटले की,  त्यांच्या मुलीचा विवाह 2005 मध्ये फर्दापूर (ता. मोताळा) येथील संतोष शंकर जाधव  याच्यासोबत झाला होता. संतोषला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो नेहमी बायकोला मारहाण करायचा. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची मुलगी माहेरी आली होती. 29 मार्चला सायंकाळी सुमारास संतोष दारू पिऊन आला व पत्‍नीला इथे राहू नको, असे म्हणाला. त्याच्या पत्‍नीने सोबत येण्यास नकार दिला असता तो पत्‍नीला काठीने मारहाण करू लागला. मी मध्यस्थी केली असता जावयाने मलासुद्धा बेदम मारहाण केली. गावातील लोकांनी हे भांडण सोडविले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: