क्राईम डायरीमुख्य बातम्या

सोबत पळून चल, नाही तर बदनामी करेन… 17 वर्षीय मुलीला धमकी..!; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तू सोबत पळून चल, नाहीतर बदनामी करेन, अशी धमकी देत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना खामगाव शहरातील सजनपुरी भागात समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गणेश तुळशीराम सावरकर या तरुणाविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

गणेश सतत तिचा पाठलाग करायचा. काल त्‍याने तिला अडवून धमकी दिली. मुलीने भावाला ही घटना सांगितली असता भावाने त्‍याला जाब विचारला त्‍याने त्‍यालाही शिविगाळ केली. मुलीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून गणेशविरुद्ध तक्रार नोंदवली. त्‍यावरून पोलिसांनी पोस्को कायद्यासह विनयभंगाचा गुन्‍हा नोंद केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: