महाराष्ट्र

सोलापुरात १०० वर्षे जुन्या झाडातून ‘टिपटिप बरसा पाणी‘

झाड पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

सोलापूर : मागे महाराष्ट्रात गणपती दूध प्यायल्याची अफवा राज्यभर पसरली होती. तसाच काहीसा प्रकार सोलापूर शहरात घडला आहे. येथे एका १०० वर्षे जुन्या झाडाच्या फांदीतून तून टप टप टप असे सारखे पाणी गळत असल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. हा प्रकार अखंड सुरू असल्याने दूरदूरवरून हे पाणी ठिबकणारे झाड पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. कोरोनाची साथ जोरात असताना हे झाड पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. काही लोक हा दैवी चमत्कार असल्याचे सांगून झाडाचे दर्शन व पूजा करण्यासाठी धाव घेत आहेत. तर अभ्यासक व तज्ज्ञांनी हा कोणताही चमत्कार नसून हे झाड जंगली असून त्यात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. नंतर जास्तीचे पाणी झाडातून ठिपकत राहते. जंगल व पाणफुटी, दलदलीच्या ठिकाणी अशी झाडे मोठ्या प्रमाणात पाहवयास मिळतात. त्यामुळे यात चमत्कार वगैरे काही नसून ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही का असेना पण सध्या हे ‘टिपटिप पाणी‘ बरसणारे हे झाड सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: