जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजायला लागले! ९ पालिकांसह २ नगरपंचायतींचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजकीय वर्तुळात निवडणुकांचे पडघम वाजायला लागले असून, जोरदार पूर्वतयारी सुरू झाली असतानाच निवडणूक आयोगाने देखील प्राथमिक तयारीचा बिगूल वाजविला आहे. आयोगाने नजीकच्या काळात होऊ घातलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आणखी वेग येणार आहे.

जिल्ह्यातील 9 नगरपालिकांची मुदत लवकरच संपणार आहे. येत्या नोव्हेंबर वा डिसेंबरमध्ये निवडणुका अपेक्षित आहे. यात बुलडाणा, चिखली, मेहकर, देउळगावराजा, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव, शेगाव या पालिकांचा समावेश आहे. संग्रामपूर व मोताळा या नागरपंचायतींची मुदत गत डिसेंबरमध्येच संपली असून, त्यांचा प्रभागरचना, आरक्षण निश्चिती, अंतिम मान्यता आदी कार्यक्रम कधीचेच पार पडले आहेत. मात्र आता वाॅर्ड पद्धतीने निवडणूक होणार असल्याने नव्याने या प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. दुसरीकडे आयोगाने जिल्हाधिकारी यांना 9 पालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. यामुळे पालिका प्रशासन कामाला लागले आहे. राज्य शासनाने 12 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिनियमानुसार प्रभागएेवजी एक सदस्यीय वाॅर्ड पद्धती लागू केली आहे.

उद्याच्या “व्हीसी’नंतर येणार वेग
दरम्यान आजपासून कामाला सुरुवात झाली असली उद्या 24 ऑगस्ट रोजी आयोगाच्या मार्गदर्शनात आयोजित व्हीसीनंतर कामाला वेग येईल. यावेळी प्रभाग रचना, लोकसंख्या, मतदार संख्या, आरक्षण आदी विषयांवर तपशीलवार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सन 2011च्या जनगणना नुसार पालिका व नगरपंचायत ची सदस्यसंख्या निश्चित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रारूप प्रभाग रचना करण्यात येईल. मुख्याधिकाऱ्यांच्‍या अध्यक्षतेखालील समिती ही गुंतागुंतीची कार्यवाही करणार आहे. ब वर्ग पालिकांच्या प्रभाग रचनेस जिल्हाधिकारी तर अंतिम मान्यता निवडणूक आयोग तर नगरपंचायतीमध्ये जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त ही जबाबदारी पार पाडणार आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: