क्राईम डायरीमुख्य बातम्या

स्‍पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाने घेतला गळफास; लोणार तालुक्‍यातील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्‍पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना राजनी (ता. लोणार) शिवारात आज, 30 मार्चला सकाळी समोर आली.

दीपक रामप्रसाद अवचार असे या युवकाचे नाव आहे. तो पुण्यात राहून स्‍पर्धा परीक्षेची तयारी करत होता. काल 29 मार्चला गावी राजनी येथे परतला होता. रात्री शेतात झोपण्यासाठी गेला. रात्रीतूनच त्‍याने शेतातील निंबाच्‍या झाडाला गळफास घेतला. सुभाष अवचार यांनी पोलिसांना कळवले. मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्‍थळी येत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: