क्राईम डायरीमुख्य बातम्या

स्‍मार्टफोनवर पॉर्न पाहिल्यानंतर रूममेटला समलिंगी संबंधाचा आग्रह; विरोध करताच दाबला गळा!; दोघेही अल्पवयीन मुले मोताळ्याची!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्‍मार्टफोनवर पॉर्न बघितल्यानंतर रूममेटला समलिंगी संबंध ठेवण्याचा आग्रह करून त्‍याने नकार दिल्याने संतापलेल्या मित्राने त्‍याचा गळा दाबला. ही खळबळजनक घटना अकोल्यात १७ जूनला रात्री घडली होती. ही दोन्‍ही अल्पवयीन मुले मोताळा तालुक्‍यातील रहिवासी आहेत. (अल्पवयीन असल्याने गावाचे नाव टाळले आहे.)

मोताळा तालुक्‍यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुले नीटच्‍या तयारीसाठी अकोल्याच्‍या शास्‍त्रीनगरात रूम करून राहत होते. दोघे जीवलग मित्र होते. चार वर्षांपासून एकत्र शिकत होते. दहावीनंतर नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी अकोल्यातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला होता. स्मार्टफोनवर पॉर्न मुव्‍हीज पाहण्याचे वाईट व्यसन त्यांना जडले होते. घटनेच्या दिवशी पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या नादात एकाने दुसऱ्याला समलिंगी संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. पण, दुसऱ्या १७ वर्षीय मित्राने नकार दिला. त्याचा राग आल्याने गळा आवळून मित्रानेच मित्राचा खून केला. घरमालकाला या मुलाने आपला मित्र बेशुध्द पडल्याचे सांगितले होते. मृतक मुलाला दवाखान्यात आणताना मित्रही सोबत होता. मृतकाच्‍या अंगावर काही संशयास्पद खुणा दिसल्याने पोलिसांचा संशय वाढला होता. त्यांनी त्‍याच्‍या मित्रावर पाळत ठेवत त्याची चौकशीही केली होती. पण, पोलिसांना शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: