क्राईम डायरीमुख्य बातम्या

हप्तावसुली भोवली! अंढेऱ्याचा पोलीस कर्मचारी निलंबित; सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची कर्तव्‍यदक्ष “एसपीं’नी घेतली दखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अंढेरा पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेचे कर्मचारी राजू चौधरी यांना हप्तावसुली भोवली आहे. काळीपिवळी चालकाकडून २५० रुपये घेऊन खिशात टाकतानाचा त्‍यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्‍याने कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी त्‍याला निलंबित केले आहे.

चौधरी यांना जिल्हा मुख्यालयात बोलावून घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे केला जाणार आहे. देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे तपास करणार आहेत. चिखली- देऊळगाव राजा रोडवरील वाकी फाट्यावर १३ जून रोजी सायंकाळी अंढेरा पोलीस स्टेशनचे पथक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत होते. या दरम्यान राजू चौधरी यांनी काळीपिवळी चालकाकडून २५० रुपयांची लाच स्वीकारून ती रक्कम खिशात टाकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ते ४०० रुपयांची मागणी करत होते, मात्र काळीपिवळी चालकाने त्यांच्या हातावर २५० रुपयेच टेकवले होते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: