क्राईम डायरीमुख्य बातम्या

हाड हाड कुत्र्याला… राडा माणसांत!; बुलडाण्यातील घटनेत 5 जखमी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कुत्र्याला हाड हाड म्हटल्याने दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात 5 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा शहरातील भीमनगरात 9 फेब्रुवारीला घडली. पोलिसांनी काल 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भीमनगरातील रहिवासी शंकर रमेश साबळे यांनी दिलेल्या तक्र्रारीत म्हटले आहे, की समाधान मोरे, रितेश खिल्लारे, आकाश कंकाळ, बबन जाधव, सौ. माया समाधान मोरे, समाधान मोरे यांच्या 3 बहिणी, त्यांची आई, मुलगा, जावई व मित्र-नातेवाइकांनी माझ्यासह माझा भाऊ, भावजय, आई-वडिलांना काठ्या, लोखंडी पाइपने मारहाण केली. घरावर दगडफेक करून शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यात अंकुश कडूबा साबळे, सौ. कांता अंकुश साबळे, सौ. सत्यभामाबाई रमेश साबळे, रमेश देवुबा साबळे, शंंकर रमेश साबळे हे जखमी झाले आहेत. आरोपींच्या घरासमोरून जाताना कुत्र्याला हाड हाड म्हटल्याने आरोपींनी हल्ला चढवल्याचेही तक्रारीत त्यांनी म्हटले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: