क्राईम डायरीमुख्य बातम्या

हातपाय बांधलेला मृतदेह अखेर बोलला… पत्‍नीच निघाली खुनी!; साथीदासोबत मिळून काढला काटा, शेगाव तालुक्‍यातील खळबळजनक घटना

शेगाव ( ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नागझरी (ता. शेगाव) जवळील जुन्या क्रॉसिंग लाईनवर 18 एप्रिल रोजी सकाळी हातपाय बांधलेल्या अवस्‍थेत आढळलेला मृतदेह अखेर बोलला आहे. त्‍याची पत्‍नीच खुनी निघाली असून, तिच्‍यासह तिच्‍या साथीदाराला पोलिसांनी आज, 21 एप्रिलला अटक केली. या प्रकरणात आणखी काही लोक समोर येण्याची शक्‍यता पोलिस सूत्रांनी वर्तविली.

रेल्वे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवणे सुरू केले असता नागझरी रोडवर राहणाऱ्या रेखा दांदळे हिने मृतदेह पतीचा असल्याचे सांगितले होते. तिनेच रेल्वे पोलिसांकडे फिर्याद दिली होती की कुणीतरी पतीला ठार मारून रेल्वे रुळावर टाकले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बुलडाणा येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले  होते. यावेळी श्वान पथकातील जुली या श्वानाने पत्‍नी रेखा खुनी असल्याचे समोर आणले. ती घटनास्थळावरील मृतदेहाजवळून सरळ त्‍याच्‍या घरी जाऊन थांबली. या आधारावर रेल्वे पोलिसांनी तपास चक्र फिरविले. त्यात रामधन दांदळे याची पत्‍नी रेखा व तिचा साथीदार संतोष साठे यांच्‍यावर संशय वाढला. ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता त्‍यांनी खुनाची कबुली दिली. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्‍यता असून, त्‍यादृष्टीने शेगाव रेल्वे पोलिस तपास करत आहेत. खुनाचे कारण अद्याप गुलदस्‍त्‍यात आहे. तपास रेल्वे एपीआय सागर गोडे करीत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: