क्राईम डायरीमुख्य बातम्या

हात-पाय बांधलेला मृतदेह रेल्‍वे रूळावर फेकला; शेगाव तालुक्‍यातील खळबळजनक घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हात-पाय बांधलेल्या अवस्‍थेतील मृतदेह रेल्‍वे रूळावर आढळल्‍याने शेगाव तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. नागझरी (ता. शेगाव) जवळ हा मृतदेह 18 एप्रिलला सकाळी साडेसहाच्‍या सुमारास आढळला.

शेगाव रेल्‍वे पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत नागझरीजवळील बंद असलेले रेल्‍वेगेट येते. या गेटजवळ हा मृतदेह आढळला आहे. हातपाय बांधलेले असल्याने खून झाल्‍याचे निष्पन्न झाले. ओळख पटविण्यासाठी परिसरात पोलिसांनी चौकशी केली असता एका महिलेने मृतदेह पतीचा असल्याचे सांगितले. रामधन दांदडे याचा हा मृतदेह आहे. त्‍यांच्‍या पत्‍नी रेखा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्‍हा दाखल केला आहे. या प्रकरणात काही संशयितांना ताब्‍यात घेण्यात आले असून, त्‍यांची कसून चौकशी सुरू आहे. तपास शेगाव रेल्‍वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार सागर गोडे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: