बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

हितसंबंध जपण्यासाठी महामार्ग झाला कमी जास्‍त!; मेहकरातील धक्‍कादायक प्रकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लक्ष घालणार?

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव ते पंढरपूर या दुपदरी महामार्गाचे काम खंडाळा ते मेहकर शहर व पुढे पैनगंगा पुलापर्यंत खालावलेले असून, “दर्जा’ नावालाही नाही. कंत्राटदार व अभियंत्‍याने नियम धाब्‍यावर बसवून रस्‍त्‍याचा आकारच हितसंबंध जपण्यासाठी कमीअधिक केला आहे. या रस्‍त्‍याचे अनेक किस्से समोर येत असून, सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांनी केंद्रीय रस्‍ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सविस्‍तर निवेदन पाठवून रस्‍त्‍याची “पोलखोल’ केली आहे. या रस्‍त्‍याच्‍या लोकार्पणासाठी आपण स्वतः यावे आणि रस्‍ता नियमानुसार झाला का पाहावा, अशी गळही श्री. पवार यांनी घातली आहे.

या आहेत त्रुटी…

  • रस्‍त्‍याचा पृष्ठभाग खाली- वर झाला आहे. त्‍यामुळे वाहनधारकांना त्रासदायक झाले आहे.
  • पोलीस ठाण्यापासून खालच्‍या स्‍टँडपर्यंत आधी रूंद व मजबूत नाल्या करणे गरजेचे असताना आधी रस्‍ता करण्यात आला, तोही निकृष्ठ दर्जाचा.
  • रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला पेव्‍हर ब्‍लॉक टाकणे, नाल्या बांधणे यासाठी अतिशय निमुळती जागा ठेवण्यात आली आहे.
  • जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मलकापूर, खामगाव, उंद्री, अमडापूर, साखरखेर्डा, शेगाव, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आदी शहरांतून जाणाऱ्या रस्‍त्‍यांवर दुभाजक आहेत. मात्र केवळ मेहकर शहर का अपवाद ठेवण्यात आले हे अनाकलनीय आहे.
  • रस्‍त्‍यावर दुभाजक नसल्याने अपघात वाढणार आहेत.

नियम धाब्‍यावर, जबाबदार कोण?
मेहकर शहरातून हा महामार्ग नेताना नियम धाब्‍यावर बसविण्यात आल्याचे दिसून येते. त्‍यामुळे कंत्राटदाराला हा रस्‍ता आराखड्यानुसार व दर्जेदार करण्यासाठी आपल्यास्‍तरावरून सूचना कराव्यात, अशी मागणी विजय पवार यांनी गडकरी यांच्‍याकडे केली आहे.

लोकप्रतिनिधींचे काय?
जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर यांच्‍या मेहकर शहरातून हा महामार्ग जात आहे. महामार्गाचे एवढे निकृष्ठ व नियम धाब्‍यावर ठेवून काम होत असताना त्‍यांचे याकडे दूर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न मेहकरकरांना पडला आहे. महामार्ग हे नेहमी नेहमी होत नसतात. त्‍यामुळे आताच तो चांगला व्‍हावा, ही भूमिका या लोकप्रतिनिधींना का घ्यावीशी वाटली नाही हा प्रश्नच आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: