बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

हिप हिप हुर्रेऽऽ! बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा, कोरोना लसीकरणात मारली बाजी!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी आज, 16 जानेवारीला कोरोना लसीकरण मोहिमेचे आव्हान यशस्वीरित्या पेलले. एवढेच नव्हे तर टार्गेटला जवळपास गवसणी घालत राज्यात दुसर्‍या क्रमांकाची कामगिरी बजावली. त्यामुळे ही मोहीम जिल्ह्यासाठी दुहेरी ऐतिहासिक ठरली.

कोविशिल्ड लसीकरणाच्या आजच्या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणांनी 16 जानेवारीच्या मुहूर्तावर आयोजित मोहिमेसाठी सतत परिश्रम घेतले. त्याला सराव, प्रशिक्षण याची जोड दिली. यावर कळस म्हणजे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, आरडीसी दिनेश गीते, सीएस डॉ. नितीन तडस, डीएचओ डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी समन्वयाने नियोजन केले. या नियोजनाची त्यांनी आरोग्य यंत्रणांच्या मदतीने तंतोतंत अंमलबजावणी केली. यामुळे जिल्हा अमरावती विभागातच नव्हे राज्यात द्वितीय ठरला. पहिल्या क्रमांकावरील हिंगोली जिल्ह्याचे जेमतेम 200 लसीचे टार्गेट लक्षात घेतले तर बुलडाणा जिल्हा जवळपास प्रथम ठरलाय! बुलडाणा जिल्हा रुग्णालय, खामगाव, शेगाव, मलकापूर उप जिल्हा रुग्णालय व चिखली, देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालय या 6 केंद्रांना प्रत्येकी 100 लस देण्याचे टार्गेट होते. देऊलगावराजा (110), खामगाव (102), मलकापूर (100), शेगाव (100) या केंद्रांनी हा टप्पा गाठला, पार केला. बुलडाणा व चिखलीत प्रत्येकी 81 हेल्थ वर्कर्सना लस देण्यात आली. विशेष म्हणजे या दरम्यान लस घेणार्‍या 575 जणांना कोणताही त्रास, साइड इफेक्टची अडचण आली नाही.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: