कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

हुssश्श! आरडीसी निघाले निगेटिव्ह!; प्रशासनाने सोडला सुटकेचा श्वास!!

सहकाऱ्यांसह लस घेऊन आनंद केला साजरा
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाविरुद्धच्या लढाईत योद्धा ठरलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या बातमीने जिल्हा हादरला. त्याला जिल्हा प्रशासन सुद्धा अपवाद नव्हते. या धक्क्यातून सावरत पालकमंत्र्यांच्‍या संपर्कात आलेल्यांची वेगळीच धावपळ उडाली. ही धावपळ होती लगेच कोरोना टेस्ट करून घ्यायची! शिंगणे यांनी आपल्या ट्विटर संदेशात संपर्कात आलेल्यांनीही कोरोना विषयक चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. यामुळे या सूचनेला अनुसरून जिल्हा प्रशासनातील योद्धा ठरलेले आरडीसी दिनेश गीते यांनी सुद्धा चाचणी करून घेतली. जिल्हा प्रशासनाचा अर्धाधिक भार सांभाळणारे व टीमवर्कने काम करणारे श्री. गिते यांचा रिपोर्ट काय येतो, याबद्दल कर्मचारी व अन्य अधिकाऱ्यांतही धाकधूक होती.

धीरोदात्तपणे अहवालाची प्रतीक्षा करत कामकाज करणारे आरडीसींची मात्र आपल्या संपर्कामुळे कोणाला त्रास नको, अशी भावना होती, मात्र सुदैवाने 17 फेब्रुवारीच्‍या संध्याकाळी त्‍यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यांच्यासह जिल्हा कचेरीने सुटकेचा श्वास सोडला!
…आणि कोविशिल्‍ड!
दरम्यान, आज पुढचे पाऊल टाकीत श्री. गीते यांनी बुलडाणा एसडीओ राजेश्वर हांडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विनोद पाटील, नायब तहसीलदार विजय पाटील, संजय बनगाळे आणि जिल्हा कचेरीमधील काही कर्मचाऱ्यांसह कोरोना लस घेतली. अर्धा तास निरीक्षण कक्षात बसल्यावर वा नंतरही कोणताच त्रास जाणवत नसल्याचे गीते यांनी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना सांगितले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: