क्राईम डायरीमुख्य बातम्या

हेअर सलून मालकाची बुलडाण्यात आत्‍महत्‍या

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हेअर सलून मालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, २१ ऑगस्ट रोजी रुईखेड टेकाळे (ता. बुलडाणा) येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली.

केशव तोताराम रायकर (रा. रुईखेड टेकाळे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रायकर यांचे बुलडाण्यात हेअर सलूनचे दुकान आहे. त्यांची दोन्ही मुले सलूनचे काम करतात. आज मुले बुलडाण्याला तर पत्नी बाहेर गेलेली असताना त्यांनी घरातील लोखंडी अँगलला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. रायकर यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: