बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

हेलो हेलो करून वैतागलेले शिवसैनिक चढले मोबाइल टॉवरवर!; खोरमध्ये विरुगिरी!!

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोबाइलला रेंजच राहत नसल्याने चिखली तालुक्‍यातील नागरिक वैतागले आहेत. मोबाइल नेटवर्कची समस्या निकाली काढण्याच्‍या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खोर (ता. चिखली) येथील मोबाइल टॉवरवर काल विरुगिरी केली. आठ दिवसांत मोबाइल टॉवरची फ्रिक्वेन्सी वाढविण्यात येईल व समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने तहसीलदारांच्‍या मध्यस्‍थीने दिले. त्‍यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतले.

चिखली शहराजवळील माळशेंबा, खोर, अंत्री, वाघापूर, चांधई, गोद्री, पळसखेड दौलत, भोकर या गावांमध्ये कायम मोबाइल नेटवर्कची समस्या असते. सध्या ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. कोणतेही अर्जंट काम असेल तर कॉल लागत नाहीत. इंटरनेट चालत नाही. त्‍यामुळे नागरिक वैतागले आहेत. शिवसेनेचे नंदू कऱ्हाडे यांच्‍या नेतृत्त्वात अखेर प्रितम गैची, पप्पू परिहार, आनंद गैची, प्रवीण सरदड, पंकज हाके, प्रदीप माळोदे यांच्‍यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खोर येथील मोबाइल टॉवरवर चढून ठिय्या मांडला. अखेर तहसीलदार श्री. येळे यांच्या मध्यस्‍थीने आंदोलन खाली उतरले. कंपनी प्रतिनिधी पांडे यांनी आठ दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: