क्राईम डायरीमुख्य बातम्या

३० वर्षीय युवकाची शेतात आत्‍महत्‍या, मलकापूरजवळील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बोदवड रोडवरील शेतात बोरीच्या झाडाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन ३० वर्षीय युवकाने आत्‍महत्‍या केली. ही घटना आज, २ ऑगस्‍ट सकाळी सहाला समोर आली.
प्रमोद सारंगधर रोंधळकर (रा. कळमेश्वर, जि. अकोला, ह. मु. हनुमाननगर, मलकापूर) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. गजेंद्र डवले यांच्या शेतात त्‍याने आत्‍महत्‍या केली. प्रमोदचे भाऊजी किशोर भगत जंजाळकर यांनी घटनेची माहिती पोलिसांत दिली. यापूर्वीही दोनवेळी प्रमोदने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला होता, असे समजते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील असल्याची माहिती मिळत आहे. तपास नापोकाँ सचिन पाटील करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: