क्राईम डायरीमुख्य बातम्या

ॲमेझॉन ॲप वापरताय? जरा ही बातमी वाचा…खामगावच्‍या युवकाला ७८ हजारांचा गंडा!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ॲमेझॉनच्‍या ॲपमुळे पिंपळगाव राजा खुर्द (ता. खामगाव) येथील युवकाला तब्‍बल ७८ हजार २०० रुपये गमवावे लागले आहेत. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात युवकाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. या युवकाने हे पैसे घर बांधण्यासाठी ठेवले होते.

दीपक प्रल्हाद वानखडे (३१, रा. सावतानगर पिंपळगाव राजा खुर्द) असे गंडवले गेलेल्या युवकाचे नाव आहे. त्‍याने बुलडाणा लाइव्हला सांगितले, की १६ जुलैला रात्री साडेदहाच्‍या सुमारास बँकेतून एकदा ५० हजार आणि दुसऱ्यांदा २८ हजार २०० रुपये गायब झाले. त्‍याने बँकेत दुसऱ्या दिवशी संपर्क केला असता, बँकेकडून ॲमेझॉन ॲपमध्ये हे पैसे गेल्याचे सांगितले.

ॲमेझॉनच्‍या कस्‍टमर केअरशी संपर्क केला असता त्‍यांनी या रकमेतून गिफ्‍ट व्हाऊचर खरेदी केल्याचे सांगितले. हे १० हजार रुपयांचे पाच आणि ९ हजार ३०० रुपयांचे तीन असे व्‍हाऊचर खरेदी केले होते. असे कोणतेच व्‍हाऊचर खरेदी केले नाहीत, असे युवकाने त्‍यांना सांगितले असता कुणीतरी हॅकरने हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले. त्‍यानंतर या कार्डची रक्‍कम वॉलेटमध्ये कन्व्हर्ट करून घेण्यात आली. मात्र त्‍यातून केवळ खरेदी होईल, पैसे परत मिळणार नाहीत. पैसे सुरक्षित असल्याचे या युवकाला सांगण्यात आले. मात्र नंतर हे पैसेही ओटीपी पाठवून हॅकरने गायब केले. त्‍यामुळे दीपकने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक सचिन चव्हाण करत आहेत. दीपक मजुरी करतो. त्‍याने घरासाठी हे पैसे जमा करून ठेवले होते. त्‍यामुळे त्‍याच्यावर आता मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: