अंगावरचे कपडे फाडत म्हणाला, मी गावचा माजी सरपंच!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने तरवाडी (ता. नांदुरा) येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले. यात जवळा बाजार (ता. नांदुरा) येथील माजी सरपंचाचाही समावेश आहे. यावेळी त्याने मी जवळा बाजारचा माजी सरपंच आहे. तुम्ही माझ्या क्लबवर कसे काय रेड केली, तुम्हाला इतर ठिकाणी छापा मारता …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने तरवाडी (ता. नांदुरा) येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी 9 जणांना ताब्‍यात घेतले. यात जवळा बाजार (ता. नांदुरा) येथील माजी सरपंचाचाही समावेश आहे. यावेळी त्‍याने मी जवळा बाजारचा माजी सरपंच आहे. तुम्ही माझ्या क्लबवर कसे काय रेड केली, तुम्हाला इतर ठिकाणी छापा मारता येत नाही का असे म्हणत त्याने स्वतःच अंगावरचे कपडे फाडल्‍याचा प्रकार घडला. 9 जणांकडून 4 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही  कारवाई 21 मार्चला सायंकाळी करण्यात आली, या प्रकरणात 22 मार्चला पहाटे 2 वाजेच्या दरम्यान बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विठ्ठल गुलाबराव शिंगोटे (रा. जवळा बाजार ता. नांदुरा) असे या माजी सरपंचाचे नाव असून, त्‍याने कारवाई दरम्‍यान बराच गोंधळ घातला. मी आता पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार करणार आहे, असेही तो ओरडत होता.