अंघोळ करत असताना मुलीचा व्हिडिओ काढून टाकला व्‍हॉट्‌स ॲप ग्रुपवर, नांदुऱ्यातील धक्‍कादायक प्रकार

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १५ वर्षीय मुलगी अंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ काढून व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकण्यात आला. ही धक्कादायक घटना नांदुरा शहरात समोर आली असून, पोलिसांनी विजय दयाराम इंगळे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विजय सध्या पुण्यात आहे. तिथूनच त्याने हे कृत्य केले. १९ जूनला पीडित मुलीच्या आईने नांदुरा पोलीस ठाणे गाठून …
 
अंघोळ करत असताना मुलीचा व्हिडिओ काढून टाकला व्‍हॉट्‌स ॲप ग्रुपवर, नांदुऱ्यातील धक्‍कादायक प्रकार

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः १५ वर्षीय मुलगी अंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ काढून व्हॉट्‌स ॲप ग्रुपवर टाकण्यात आला. ही धक्‍कादायक घटना नांदुरा शहरात समोर आली असून, पोलिसांनी विजय दयाराम इंगळे या तरुणाविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. विजय सध्या पुण्यात आहे. तिथूनच त्‍याने हे कृत्‍य केले.

१९ जूनला पीडित मुलीच्‍या आईने नांदुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. शहरातील १५ वर्षीय मुलगी अंघोळ करत असताना काही दिवसांपूर्वी तिच्‍या घराजवळच राहणाऱ्या विजयने लपून तिचा व्हिडिओ काढला होता. आता पुण्यात गेल्यावर एका व्‍हॉट्‌स ॲप ग्रुपवर त्‍याने हा व्हिडिओ टाकला. पोलिसांनी विजयविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे करत आहेत.