अंचरवाडीत एकाच रात्री तीन घरे फोडली

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे एकाच रात्री तीन घरे फोडण्यात आल्याची घटना आज, २ ऑक्टोबरला सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंचरवाडी येथील सिंधू दत्तू जाधव या घरासमोर ओट्यावर झोपल्या होत्या. सकाळी त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. घरातील निळ्या पेटीत ठेवलेले १५ हजार …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे एकाच रात्री तीन घरे फोडण्यात आल्याची घटना आज, २ ऑक्टोबरला सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंचरवाडी येथील सिंधू दत्तू जाधव या घरासमोर ओट्यावर झोपल्या होत्या. सकाळी त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. घरातील निळ्या पेटीत ठेवलेले १५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. त्यांच्या घराशेजारील रवींद्र तेजराव परिहार यांच्या घरात सुद्धा चोरट्यांनी प्रवेश करून घरातील रोख दोन हजार रुपये व सोन्याची एकदानी पोत किंमत ८ हजार रुपये लंपास केले. घराच्या बाजूला राहणारे हिरालाल शिंगणे यांच्या वाड्यातील ८ कोंबड्यासुद्धा चोरट्यांनी लंपास केल्या. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपास ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले करीत आहेत.