अंचरवाडी येथील सिंचन तलावाला वृक्षांचा विळखा; वेळीच खबरदारी घेण्याची गरज

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंचरवाडी येथील सिंचन तलाव क्रमांक १ ला काटेरी झुडूपांसह अनेक वृक्षांनी विळखा घातला आहे. त्यामुले तलावाला धोका निर्माण झाला असून, भिंतीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंचन विभागाने याची दखल घेऊन आमखेडची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे. अंचरवाडीच्या दक्षिणेस भाग १ आणि भाग २ असे दोन …
 
अंचरवाडी येथील सिंचन तलावाला वृक्षांचा विळखा; वेळीच खबरदारी घेण्याची गरज

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंचरवाडी येथील सिंचन तलाव क्रमांक १ ला काटेरी झुडूपांसह अनेक वृक्षांनी विळखा घातला आहे. त्यामुले तलावाला धोका निर्माण झाला असून, भिंतीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंचन विभागाने याची दखल घेऊन आमखेडची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे.

अंचरवाडीच्या दक्षिणेस भाग १ आणि भाग २ असे दोन मोठे सिंचन तलाव आहेत. या तलावामुळे अंचरवाडी, वसंतनगर, शेलगाव आटोळ, डोड्रा शिवारातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळते. मात्र गेल्या काही वर्षांपासून तलावांची देखरेख होत नसल्याचे चित्र आहे. दोन्ही तलावांमधून लाखो रुपयांच्या माशांचे उत्पादन होते. त्यासाठी लिलावही केला जातो.

मात्र तलावाची नियमित देखरेख होत नसल्याने तलावाच्या दोन्ही भिंतीवर मोठमोठी काटेरी झुडपे वाढली आहेत. तलावाच्या सांडव्यात सुद्धा झाडांच्या मुळ्या खोलवर घुसल्याने सांडव्याला तडे गेले आहेत. या वर्षी परिसरात चांगला पाऊस झाल्याने दोन्ही धरणे जुलै महिन्यातच तुडूंब भरली आहेत. यानंतरच्या काही दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने तसे झालेच तर आमखेडची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.