अंढेरा पोलिसांची दोन ठिकाणी जुगार अड्यावर धाड; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेरा खुर्द आणि बुद्रूकमध्ये दोन जुगार अड्ड्यांवर छापा मारून 5 जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई काल, 26 मार्चला सायंकाळी अंढेरा पोलिसांनी केली. रात्री या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. मेरा खुर्द (ता. चिखली) परिसरात जुगार रंगल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेरा खुर्द आणि बुद्रूकमध्ये दोन जुगार अड्ड्यांवर छापा मारून 5 जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई काल, 26 मार्चला सायंकाळी अंढेरा पोलिसांनी केली. रात्री या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

मेरा खुर्द (ता. चिखली) परिसरात जुगार रंगल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी छापा मारला असता 4 जुगारी रंगेहात पकडण्यात आले. शेख इम्रान शेख हनिफ (32), मेहबूब शहा मस्जिद शहा (45), सीताराम लालमन डोंगरे (57), इन्थेखान आलम मोहम्मद हयात (30, सर्व रा. मेरा खुर्द ता. चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 13770 रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई मेरा बुद्रूक येथे करण्यात आली. वरली मटका आकडे लावणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहम्मद हनिफ शेख अब्बास (58) असे आरोपीचे नाव आहे.त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ निवृत्ती पोफळे, अच्युतराव शिरसाट, कैलास उगले, पोकाँ समाधान झिने यांनी केली.