अंढेरा पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत अवैध दारू विक्री; एलसीबीने तिघांना पकडले, 60 हजारांचा मुद्देमाल जप्‍त

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांना पकडून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने 60, 332 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल, 15 मे रोजी दुपारी 12 च्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंढेरा (ता. देऊळगाव राजा) येथे देशी दारू व बारचे ३ मालक …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अंढेरा पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांना पकडून बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने 60, 332 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. ही कारवाई काल, 15 मे रोजी दुपारी 12 च्‍या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंढेरा (ता. देऊळगाव राजा) येथे  देशी दारू व बारचे ३ मालक दारूची विक्री करताना आढळले. त्‍यांना पकडून देशी विदेशी दारू (३०,३३२रुपये) व ३ मोबाइल (किंमत ३०, ०००)  असा एकूण ६०,३३२ रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोड (बुलडाणा) यांच्‍या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्‍या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ श्रीकृष्ण चांदूरकर, पोहेकाँ विलास काकड, पोहेकाँ गिता बामंदे, पोना. लक्ष्मण कटक, पोकाँ. विजय सोनुने, पोकाँ. गजानन गोरले, चालक Asi संजय मिसाळ यांनी केली.