अंत्रज, जानेफळमध्ये कोरोना उद्रेक; मेहकरमध्ये पुरुषाचा बळी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील अंत्रज (19 रुग्ण) आणि मेहकर तालुक्यातील जानेफळमध्ये (27 रुग्ण) कोरोना उद्रेक झाल्यागत स्थिती आहे. प्रशासनाने या दोन्ही गावांतील नागरिकांच्या चाचण्या घेण्यासोबतच उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाने जिल्ह्यात आणखी एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान मेहकर येथील 54 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात नव्या 321 पॉझिटिव्ह …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्‍यातील अंत्रज (19 रुग्‍ण) आणि मेहकर तालुक्‍यातील जानेफळमध्ये (27 रुग्‍ण) कोरोना उद्रेक झाल्यागत स्‍थिती आहे. प्रशासनाने या दोन्‍ही गावांतील नागरिकांच्‍या चाचण्या घेण्यासोबतच उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्‍यान, कोरोनाने जिल्ह्यात आणखी एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान मेहकर येथील 54 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात नव्‍या 321 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली असून, 294 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2310 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1989 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 321 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 238 व रॅपिड टेस्टमधील 83 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1191 तर रॅपिड टेस्टमधील 798 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 35, बुलडाणा तालुका : दुधा 1, सुंदरखेड 1, गिरडा 1, वरवंड 7, उमाळा 1, डोंगर खंडाळा 2, दहिद 3, रायपूर 2, मढ 2, सागवन 1, चिखली तालुका : भालगाव 2, सवणा 4, केळवद 1, वळती 4, भरोसा 2, शेलूद 1, आमखेड 3, हातनी 2, माळशेंबा 1, मंगरूळ 1, बेराळा 2, टाकरखेड हेलगा 6, देऊळगाव धनगर 1, खंडाळा 2, वरूड 1, चिखली शहर : 12, सिंदखेड राजा शहर : 7, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 3, मोताळा तालुका : खरबडी 1, शेलापूर 1, खामगाव शहर : 15, खामगाव तालुका : गोंधनपूर 3, जयपूर लांडे 1, अंत्रज 19, उमरा 4, शिरला 1, देऊळगाव राजा शहर : 3, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 1, उंबरखेड 1, अंढेरा 3, बायगाव 1, सुरा 2, धोत्रा नंदाई 1, मेहकर शहर : 22, मेहकर तालुका : जानेफळ 27, डोणगाव 3, शहापूर 2, थार 1, कळमेश्वर 2, मलकापूर शहर : 34, मलकापूर तालुका : विवरा 1, उमाळी 1, नांदुरा शहर : 16, नांदुरा तालुका : पोटली 1, पतोंडा 2, आलम पूर 1, चांदुर बिस्वा 5, खैरा 1, लोणार तालुका : हिरडव 2, लोणार शहर : 3, जळगांव जामोद तालुका : वाडशिंगी 1, खांडवी 1, जळगाव जामोद शहर : 1, शेगाव शहर : 20, शेगाव तालुका : भोनगाव 1, जलंब 1, मोताळा शहर :1, मूळ पत्ता भुसावळ, जि. जळगाव येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 321 रुग्ण आढळले आहेत.

294 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 294 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 40, बुलडाणा : अपंग विद्यालय 70, विनायक हॉस्पीटल 10, देऊळगाव राजा : 27, लोणार : 10, चिखली : 76, नांदुरा : 7, सिंदखेड राजा : 1, मोताळा : 7, मलकापूर : 13, जळगाव जामोद : 12, मेहकर : 13.

2627 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 141997 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 16712 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 8592 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 19534 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 2627 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 195 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.