‘अंधाराचा’ अनुभव येताच महावितरण ताळ्यावर! 60 ट्रान्सफॉर्मरला तत्काळ वीज पुरवठा!! हजारो शेतकऱ्यांना दिलासा!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थातूरमातूर तोडग्यावर समाधान न मानता थेट कारवाईचा आग्रहरूपी ठिय्या न सोडल्याने अखेर महावितरणने माघार घेत 60 ट्रान्सफॉर्मरचा वीज पुरवठा पुन्हा सुरू केल्याने अखेर तूर्तास का होईना हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय! यामुळे स्वाभिमानाचे आजचे राडावजा आंदोलन यशस्वी ठरले. महावितरणने डेप्युटी सीएमचे आदेश झुगारून थकीत वीज बिलपोटी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थातूरमातूर तोडग्यावर समाधान न मानता थेट कारवाईचा आग्रहरूपी ठिय्या न सोडल्याने अखेर महावितरणने माघार घेत 60 ट्रान्सफॉर्मरचा वीज पुरवठा पुन्हा सुरू केल्याने अखेर तूर्तास का होईना हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय! यामुळे स्वाभिमानाचे आजचे  राडावजा आंदोलन यशस्वी ठरले.

महावितरणने डेप्युटी सीएमचे आदेश झुगारून थकीत वीज बिलपोटी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा लावला. यामुळे त्रस्त व कारवाईग्रस्त शेतकऱ्यांसह स्वाभिमानीने आज 15 मार्चला अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना गाठले! नुसतेच  घेराव, ठिय्या न करता  कार्यालयाचीच वीज कापली! तसेच शेतकऱ्यांचे कट केलेले कनेक्शन तात्काळ जोडेपर्यंत  कार्यालय सोडणार नाय, असे ठणकावून सांगितले. यामुळे ताळ्यावर आलेल्या अधिकाऱ्यांनी 60 ट्रान्सफॉर्मरवरील वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. यामध्ये लव्हाळा, शेलूद, एकलारा, शेलसूर, धाड परिसरातील भडगाव सर्कलमधील ट्रान्सफॉर्मरचा समावेश आहे. या पट्ट्यातील वीज पुरवठा मागील 2 त 3 दिवसांत थेट फिडरवरून बंद करण्यात आला होता. संध्याकाळी अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.