अंधारात लपून ठरवत होते सुरुवात कशी करायची, तितक्‍याच पडली पोलिसांची नजर! शेगाव शहरातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस पेट्रोलिंगवर भर देत आहेत. अंधारात बसून चोरीचा प्लॅन आखणारे दोन चोरटे शेगाव शहर पोलिसांच्या हाती लागले आहेत. आज, २१ सप्टेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शेगाव शहर पोलिसांचे एक पथक पेट्रोलिंग करत …
 
अंधारात लपून ठरवत होते सुरुवात कशी करायची, तितक्‍याच पडली पोलिसांची नजर! शेगाव शहरातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस पेट्रोलिंगवर भर देत आहेत. अंधारात बसून चोरीचा प्लॅन आखणारे दोन चोरटे शेगाव शहर पोलिसांच्या हाती लागले आहेत. आज, २१ सप्टेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

शेगाव शहर पोलिसांचे एक पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी शेगावच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या कॉम्प्लेक्समधील शटरकडे पोलिसांनी बॅटरी फिरवली. तेव्हा दोन जण गुपचूप चर्चा करताना पोलिसांना दिसले. पोलिसांची नजर आपल्यावर पडली, असे लक्षात येताच त्यांनी पळ काढून दुसरीकडे लपण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही पकडले. पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखिलेशकुमार गौरीशंकर भारती (२५, रा. उत्तरप्रदेश) व शेख हुसेन शेख दानिश (२२, रा. टिपू सुलतान चौक, बुलडाणा) असे पकडलेल्यांची नावे आहेत. दोघेही चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.