राहेरी पूल जड वाहतुकीसाठी बंद

किनगाव राजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर- जालना महामार्गावरील राहेरी येथील खडकपूर्णा नदीवरील पूल अनेक दिवसांपासून जीर्ण झालेला आहे. त्यामुळे सरकारने अनेक दिवसांपासून हा महामार्ग जड वाहनांसाठी बंद केलेला आहे. तरीही जड वाहतूक सुरू असल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून आज, 29 मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल लोखंडी …
 

किनगाव राजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर- जालना महामार्गावरील राहेरी येथील खडकपूर्णा नदीवरील पूल अनेक दिवसांपासून जीर्ण झालेला आहे. त्‍यामुळे सरकारने अनेक दिवसांपासून हा महामार्ग जड वाहनांसाठी बंद केलेला आहे. तरीही जड वाहतूक सुरू असल्याने पावसाळ्याच्‍या पार्श्वभूमीवर कोणती दुर्घटना होऊ नये म्‍हणून आज, 29 मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल लोखंडी बॅरिकेड्स लावून बंद केला. राहेरीऐवजी देऊळगाव महीमार्गे जड वाहतूक वळवण्यात आली आहे. यापूर्वीही पूल बंद करण्यात आला होता. मात्र काही जड वाहतूक करणाऱ्यांनी खांब तोडून वाहतूक सुरू केली होती. याकडे संबंधित अधिकारी दूर्लक्ष करताना दिसत होते. आता 6 फूटांपर्यंत बॅरिकेट्‌स लावले आहेत. त्यामुळे पुलावरून फक्त छोटे वाहन जाऊ शकेल. प्रशासनाने लवकरात लवकर पुलाचे काम करावे, अशी मागणी होत आहे.