अखेर दिलासा!; बर्ड फ्‍लूसाठीचे ते नमुने निगेटिव्‍ह!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक सुरू झाला आहे. हा उद्रेक सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात बर्ड फ्लूने थैमान घातले होते. चिखली तालुक्यातील भानखेड येथून बर्ड फ्लूने जिल्ह्यात एंट्री केली होती. पाठोपाठ मोताळा तालुक्यातील साराेळापीर आणि शेगाव तालुक्यातील भोलपुरा येथील पक्षांचे अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आले होते. नंतरच्या काळात देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही, संग्रामपूर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक सुरू झाला आहे. हा उद्रेक सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात बर्ड फ्‍लूने थैमान घातले होते. चिखली तालुक्यातील भानखेड येथून बर्ड फ्‍लूने जिल्ह्यात एंट्री केली होती. पाठोपाठ मोताळा तालुक्यातील साराेळापीर आणि शेगाव तालुक्यातील भोलपुरा येथील पक्षांचे अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आले होते. नंतरच्या काळात देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही, संग्रामपूर तालुक्यातील पलसोडा आणि शेगाव तालुक्यातील चारमोरी येथे कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यामुळे याठिकाणचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. या सर्व नमुन्‍यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.