अखेर प्रसेनजीत पाटलांनी हातावर बांधले घड्याळ!; मुंबईत पार पडला प्रवेश सोहळा!! जळगाव मतदारसंघाचा राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित?

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसमधील कथित गटबाजी व राजकीय अन्यायाला कंटाळून पक्षत्याग करणारे काँग्रेसचे नेते प्रसेनजीत पाटील यांनी आज (23 जून) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रीतसर प्रवेश घेतला. यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार राहणार असल्याचे मानले जात आहे.मुंबईत पार पडलेल्या या दमदार प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसमधील कथित गटबाजी व राजकीय अन्यायाला कंटाळून पक्षत्याग करणारे काँग्रेसचे नेते प्रसेनजीत पाटील यांनी आज (23 जून) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रीतसर प्रवेश घेतला. यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार राहणार असल्याचे मानले जात आहे.
मुंबईत पार पडलेल्या या दमदार प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह अनेक मान्यवर व पाटील समर्थक उपस्थित होते. यापूर्वी पाटील यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित असतानाच आज 23 जूनच्या मुहूर्तावर त्यांनी हाती घड्याळ बांधत राजकारणाची नवीन दिशा ठरवली. राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही सक्रिय असल्याने त्यांनी राष्ट्रवादीची निवड केली असावी, असा जाणकारांचा होरा आहे. पुढील निवडणुकीत ते घड्याळ चिन्हावर आपले नशीब आजमावणार असा सध्याचा रागरंग आहे.