…अखेर राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा “जीआर’ निघाला ! सर्वसाधारण ३१ जुलै तर विशेष बदल्या १४ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश; मर्यादितच कार्यवाहीचे निर्देश

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या धुमाकूळामुळे ३० जूनपर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना “स्थगिती’ देण्यात आली होती. यामुळे हवालदिल झालेल्या राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने आज, ९ जुलैला दिलासा दिलाय! मर्यादित स्वरूपात का होईना या बदल्यांना मुभा देण्यात आली असून, १४ ऑगस्टपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. …
 
…अखेर राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा “जीआर’ निघाला ! सर्वसाधारण ३१ जुलै तर विशेष बदल्या १४ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश; मर्यादितच कार्यवाहीचे निर्देश

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या धुमाकूळामुळे ३० जूनपर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना “स्थगिती’ देण्यात आली होती. यामुळे हवालदिल झालेल्या राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने आज, ९ जुलैला दिलासा दिलाय! मर्यादित स्वरूपात का होईना या बदल्यांना मुभा देण्यात आली असून, १४ ऑगस्टपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

यापूर्वी कोरोनाच्या प्रकोपामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत न करण्याचे आदेश १० मे २०२१ रोजी देण्यात आले होते. यामुळे बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील बदलीपात्र वा इच्छुक अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ झाले होते. मात्र आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मर्यादित स्वरूपात १४ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सर्वप्रथम ३१ जुलैपर्यंत सर्वसाधारण बदल्या करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. मात्र राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता एकूण जागेच्या १५ टक्केच बदल्या कराव्यात, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यानंतर विशेष कारणावरून करावयाच्या बदल्या १४ आॅगस्टपर्यंत करण्यात येतील. त्यासाठी १० टक्के पदांची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.