अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना

अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज, १५ सप्टेंबर रोजी अंढेरा – मलकापूर पांग्रा रस्त्यावरील सावखेड नागरे गावाजवळ घडली. शेख रशीद शेख शेख हसन (५५, रा. अंढेरा ता. देऊळगाव राजा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख रशीद हे मलकापूर पांग्रा येथे नातेवाइकांच्या भेटीसाठी गेले होते. तेथून अंढेरा …
 
अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना

अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज, १५ सप्टेंबर रोजी अंढेरा – मलकापूर पांग्रा रस्त्यावरील सावखेड नागरे गावाजवळ घडली. शेख रशीद शेख शेख हसन (५५, रा. अंढेरा ता. देऊळगाव राजा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शेख रशीद हे मलकापूर पांग्रा येथे नातेवाइकांच्या भेटीसाठी गेले होते. तेथून अंढेरा येथे परतताना त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच २८ डी ८९९९) ला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अंढेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमीला उपचारासाठी देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेख रशीद यांचा मुलगा शेख आसिफने दिलेल्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ गजानन वाघ करीत आहेत.