अटाळीच्‍या बसस्‍थानकावर चालू होता जुगार

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसस्थानक परिसरात जुगार खेळविणाऱ्या तरुणाला खामगाव ग्रामीण पोलिसांनी पकडले. अटाळी (ता. खामगाव) येथे काल, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संदीप दामोदर महानकार (38, रा. उंद्री) असे ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्याचे नाव आहे. तो वरली-मटक्याचा जुगार खेळविताना आढळला. त्याच्याजवळून नगदी 850 रुपये व …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बसस्‍थानक परिसरात जुगार खेळविणाऱ्या तरुणाला खामगाव ग्रामीण पोलिसांनी पकडले. अटाळी (ता. खामगाव) येथे काल, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संदीप दामोदर महानकार (38, रा. उंद्री) असे ताब्‍यात घेतलेल्या जुगाऱ्याचे नाव आहे. तो वरली-मटक्याचा जुगार खेळविताना आढळला. त्याच्याजवळून नगदी 850 रुपये व जुगाराचे साहित्य असा एकूण 855 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ सुनील राऊत करत आहेत.