अट्टल गुन्‍हेगार श्रावण निंबाळकर जिल्ह्यातून हद्दपार!; जलंब पोलिसांची कामगिरी

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बलात्कार, खून, विनयभंग, दुखापत, दारू पिऊन धिंगाणा घालणे असे एक ना अनेक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगार श्रावण जानुजी निंबाळकर (४५, रा. टाकळी हाट, ता. शेगाव) याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध जलंब पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव …
 
अट्टल गुन्‍हेगार श्रावण निंबाळकर जिल्ह्यातून हद्दपार!; जलंब पोलिसांची कामगिरी

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बलात्‍कार, खून, विनयभंग, दुखापत, दारू पिऊन धिंगाणा घालणे असे एक ना अनेक गुन्‍हे दाखल असलेल्या अट्टल गुन्‍हेगार श्रावण जानुजी निंबाळकर (४५, रा. टाकळी हाट, ता. शेगाव) याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्‍याच्‍याविरुद्ध जलंब पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍याकडे प्रस्‍ताव पाठवला होता. हा प्रस्ताव श्री. चावरिया यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. तो पारित झाला असून, १७ सप्‍टेंबरपासून श्रावण निंबाळकर हा एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आला आहे.

श्रावण निंबाळकरला न्यायालयाने बलात्‍काराच्‍या गुन्ह्यात शिक्षाही सुनावलेली आहे. त्‍याच्‍या गुन्‍हेगारी प्रवृत्तीमुळे गाव आणि पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत सर्वसामान्यांच्‍या जिवाला धोका निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्‍यता असल्याने जलंब पोलिसांनी त्‍यांच्‍याविरुद्ध हद्दीपारीचा प्रस्‍ताव दिला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक (खामगाव) हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्‍या मार्गदर्शनाखाली जलंब पोलिसांनी केली.