अडीच तासांत ४५० सिलिंडरचे धडामधूम धमाके

वीज कोसळल्याने राजस्थानात गॅस सिलिंडर नेणारा ट्रक खाकजयपूर : वीज कधी, कुठे,केव्हा कोसळेल काही सांगता येत नाही. राजस्थानात भिलवाडा जिल्ह्यात गॅस सिलिंडरची वाहतूक करणार्या एका ट्रकवर अचानक वीज कोसळली. पाहता ट्रकला आग लागली व जवळपास ४५० सिलिंडर आगीत वेढले गेले. त्यानंतर जवळपास पुढील अडीच तास त्याठिकाणी सिलिंडरचे एका पाठोपाठ असे विस्फोट सुरू होते. त्याचे आवाज …
 

वीज कोसळल्याने राजस्थानात गॅस सिलिंडर नेणारा ट्रक खाक
जयपूर
: वीज कधी, कुठे,केव्हा कोसळेल काही सांगता येत नाही. राजस्थानात भिलवाडा जिल्ह्यात गॅस सिलिंडरची वाहतूक करणार्‍या एका ट्रकवर अचानक वीज कोसळली. पाहता ट्रकला आग लागली व जवळपास ४५० सिलिंडर आगीत वेढले गेले. त्यानंतर जवळपास पुढील अडीच तास त्याठिकाणी सिलिंडरचे एका पाठोपाठ असे विस्फोट सुरू होते. त्याचे आवाज आठ ते दहा किलोमीटर परिसरात ऐकू येत होते व दूरवरून घटनास्थळी आगीचे लोळ दिसत होते.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एका कंपनीचे सिलिंडर घेऊन एक ट्रक जयपूरहून कोटाला जात होता. त्या ट्रकमध्ये ४५० गॅस सिलिंडर होते. अचानक कोटा- जयपूर महामार्गावर वातावरण बदलले आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी सोसाट्याचा वारा सुरू झाला.अचानक विजेचा कडकडाट झाला व ट्रकवरच वीज कोसळली. तो धमाका पाहून चालक कसाबसा जीव वाचवून लांब पळाला म्हणून वाचला. पण आगीत तो गंभीर जखमी झाला असून त्यांचयावर उुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाहता पाहात सिलिंडरचे विस्फोट सुरू झाले..ंएकापाठोपाठ एक असे ४५० सिलिंडरचे स्फोट झाले. आकाशात उंच उडून सिलिंडर दूरवर फेकले जाऊन फुटत होते. सिलिंडरचे तुकडे दोन किलोमीटर परिसरात विखुरले गेले.घटनेत ३५ वर्षीय चालक सतराज मीना गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.