अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ… 771 लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर; 669 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे स्वयंरोजगार उभे करण्यासाठी विविध कर्ज वितरण योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 669 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झाला आहे. तसेच आतापर्यंत 771 लाभार्थ्यांना बँकेने …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे स्वयंरोजगार उभे करण्यासाठी विविध कर्ज वितरण योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 669 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झाला आहे. तसेच आतापर्यंत  771 लाभार्थ्यांना बँकेने कर्ज प्रकरण मंजूर केले आहेत.

या कर्ज प्रकरणांमध्ये 267 कोटी 64 लक्ष 56 हजार 874 रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये 3776 अर्जदारांनी अर्ज केले. त्यापैकी 1082 लाभार्थ्यांना LOI (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले आहे. म्हणजे 1082 लाभार्थी पात्र ठरले. यापैकी 771 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. महामंडळाकडून 708 लाभार्थ्यांना व्याज परतवाना मंजूर करण्यात आला. व्याज परतावा 669 लाभार्थ्यांना सुरूदेखील झाला. आजपर्यंत 4 कोटी 69 लक्ष 4 हजार 91 रक्कम व्याज परताव्यापोटी वितरीत करण्यात आले आहेत.  त्याचप्रमाणे महामंडळाची दुसरी योजना गट कर्ज व्याज परतावा आहे. यामध्ये 6 गटांनी अर्ज केले. 3 गटांना LOI (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले. यामध्ये 42 हजार 140 रुपयांचा व्याज परतावा झालेला आहे.  तसेच प्रकल्प कर्ज योजनांमध्ये 19 गटांची संख्या आहे. अशाप्रकारे या तीनही योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय कार्यान्वीत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. त्यामुळे अर्ज करण्यास लाभार्थ्यांना सुविधा आहे. अर्ज केल्यानंतर बँकेकडे प्रकरण मंजुरीसाठी पाठविण्यात येते. बँकेकडे पाठविण्यासाठी लेटर ऑफ इंटेन्ट देण्यात येते. लेटर ऑफ इंटेन्ट बँकेकडे देण्यात आल्यानंतर कर्ज प्रकरणात कर्जाची रक्कम देण्यात येते. अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर किंवा 07262-242342 क्रमांकावर व महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम अंभोरे यांनी केले आहे.