अतिरिक्त जिल्हाधिकारी दुबे अखेर ‘रिलिव्ह’; यवतमाळला झाले रुजू

बुलडाणा (संजय मोहिते ः विशेष प्रतिनिधी) ः येथील सुमारे 3 वर्षांच्या कार्यकाळात आपल्या धडाकेबाज कार्यशैलीची छाप उमटविणारे व रेती माफियांचे कर्दनकाळ अशी ख्याती मिळविणारे बुलडाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी अखेर बुलडाण्याला गुडबाय करत 11 जानेवारीला यवतमाळ अप्पर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. प्रमोदसिंह दुबे यांची गत् 15 डिसेंबर 2020 रोजी यवतमाळ येथे याच पदावर बदली …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः विशेष प्रतिनिधी) ः येथील सुमारे 3 वर्षांच्या कार्यकाळात आपल्या धडाकेबाज कार्यशैलीची छाप उमटविणारे व रेती माफियांचे कर्दनकाळ अशी ख्याती मिळविणारे बुलडाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी अखेर बुलडाण्याला गुडबाय करत 11 जानेवारीला यवतमाळ अप्पर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.

प्रमोदसिंह दुबे यांची गत् 15 डिसेंबर 2020 रोजी यवतमाळ येथे याच पदावर बदली झाली होती. मात्र त्यांच्या जागी अन्य अधिकार्‍याची नियुक्ती न झाल्याने ते सुमारे महिनाभर येथेच कार्यरत होते. अखेर त्यांनी आपल्या पदाची सूत्रे एकतर्फी आरडीसी दिनेश गीते यांना सोपवत बुलडाण्याचा निरोप घेतला. त्यांनी 11 जानेवारीला संध्याकाळी यवतमाळचे आरडीसी ललीतकुमार वराडे यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, एके सय्यद यामीन यांनी त्यांचे स्वागत केले. ते 7 जुलै 2017 रोजी अकोला येथून बुलडाणा येथे उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांना बुलडाणा येथेच अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती व नियुक्ती मिळाली होती, सरत्या वर्षात त्यांची यवतमाळ येथे अप्पर जिल्हाधिकारी पदी बदली झाली.