अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात ४८ कोटींचा निधी; ८ तालुक्यांना तात्काळ वितरण

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात गत् वर्षात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामाला जबर फटका बसला होता. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात ४७ कोटी ७० लाख ७० हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे ८ तालुक्यांना वितरण करण्यात आले असून, लवकरच मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात …
 

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात गत् वर्षात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामाला जबर फटका बसला होता. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात ४७ कोटी ७० लाख ७० हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे ८ तालुक्यांना वितरण करण्यात आले असून, लवकरच मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

मागील जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीने ७ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना जबर तडाखा मिळाला. यामुळे राज्यातील आघाडी सरकारने जिल्ह्याला २ टप्प्यांत मदत दिली. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला सुमारे ४८ कोटींचा निधी मिळाला. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, आरडीसी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक आपत्ती कक्षाचे नायब तहसीलदार संजय बनगाळे त्यांचे सहकारी अनंत साळवे यांनी त्याचे ८ तालुक्यांना मागणीनुसार वाटप केले. तालुकानिहाय निधी चिखली २ कोटी, शेगाव ४ कोटी ३२ लक्ष, मेहकर २ कोटी, देऊळगावराजा २ कोटी १३ लाख, सिंदखेड राजा २७ कोटी, लोणार ८० लाख ४८ हजार, नांदुरा २० लाख ११ हजार, मोताळा २ लाख ३६ हजार.