अतिवृष्टीग्रस्‍त शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही…शेतकऱ्यांची फिर्याद

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पावसातील अनियमितता, त्यातच अतिवृष्टी अन् कपाशीवर पडलेला रोग यामुळे यावर्षी उत्पन्नात 45 ते 50 टक्के घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काहींचा उत्पादन खर्चही निघाला नसल्याचे शेतकरी सांगतात. ”100 क्विंटल कापूस 50 वर आला. खर्चही भरपूर झाला. आता तुम्हीच सांगा कसं जगायच? असा सवाल करत सरकारच्या मदतीचा अजून काही मेळ नसल्याची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पावसातील अनियमितता, त्यातच अतिवृष्टी अन्‌ ‌कपाशीवर पडलेला रोग यामुळे यावर्षी उत्पन्‍नात 45 ते 50 टक्के घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काहींचा उत्पादन खर्चही निघाला नसल्याचे शेतकरी सांगतात. ”100 क्विंटल कापूस 50 वर आला. खर्चही भरपूर झाला. आता तुम्हीच सांगा कसं जगायच? असा सवाल करत सरकारच्‍या मदतीचा अजून काही मेळ नसल्‍याची तक्रार मंडपगाव (ता. देऊळगाव राजा) येथील शेतकरी श्यामसुंदर देशमुख यांचे.

देऊळगाव राजा तालुक्यात अंढेरा, धोत्रा नंदई, पिंप्री आंधळे, मंडपगाव हे भाग कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे ओळखले जातात. गेल्यावर्षी कापसाचे चांगले उत्पन्‍न झाले. त्यामुळे याहीवर्षी चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. शेतकरी बबनराव पालवे दरवर्षी कपाशी लावतात. यावर्षी त्यांनी 8 एकरात कपाशी लावली होती. दीड लाख रुपयापर्यंत खर्च झाला. दरवर्षी 100 क्विंटल कापूस व्हायचा. यावर्षी 45 क्विंटलपर्यंत उत्पन्न घसरले. त्यामुळे यावर्षी शेतीवर हल्लाच झाल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा राज्य सरकारने केली होती मात्र अजून काही मदत मिळाली नसल्याचेही एका शेतकऱ्याने सांगितले.