अतिवृष्टीचा बळी!; सोयाबीन पीक वाया गेल्याने शेतकऱ्याने घरातच घेतला गळफास; मेरा खुर्द येथील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पत्नी मुलांसह गेली असताना घरी एकट्या असलेल्या शेतकऱ्याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० जुलैला सायंकाळी सातच्या सुमारास मेरा खुर्द (ता. चिखली) समोर आली. शंकर श्रीराम देशमाने (३०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शंकर देशमाने यांची मेरा खुर्द शिवारात ४ एकर शेती आहे. शेतीवर महाराष्ट्र बँकेच्या …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पत्नी मुलांसह गेली असताना घरी एकट्या असलेल्या शेतकऱ्याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० जुलैला सायंकाळी सातच्‍या सुमारास मेरा खुर्द (ता. चिखली) समोर आली. शंकर श्रीराम देशमाने (३०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शंकर देशमाने यांची मेरा खुर्द शिवारात ४ एकर शेती आहे. शेतीवर महाराष्ट्र बँकेच्‍या मेरा खुर्द शाखेचे ५० हजार रुपयांचे पीककर्ज त्‍यांनी घेतले होते. मात्र यावर्षी परिसरात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील सोयाबीनमध्ये पाणीच पाणी झाले. संपूर्ण शेती चिभडली गेल्याने आता उत्पन्न निघणार नाही व बँकेचे कर्जही फेडता येणार नाही या विवंचनेत ते होते. यातूनच त्‍यांनी टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्‍यता ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केली. देशमाने हे आई, पत्नी, ३ मुली, १ मुलगा अशा परिवाराचा एकमेव कर्ता पुरुष होते. आत्‍महत्‍येची घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तपास पोहेकाँ निवृत्ती पोफळे करीत आहेत.