अतिवृष्टीचा सहावा बळी!; पालकमंत्र्यांच्‍या मतदारसंघात ५५ वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास!!; मदतीवाचून असे किती बळी जाणार??

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २७, २८ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ९० टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. अशावेळी तातडीने ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र सरकारकडून पंचनामे, सर्वे, पाहणीच्या नावाखाली वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याचे गंभीर …
 
अतिवृष्टीचा सहावा बळी!; पालकमंत्र्यांच्‍या मतदारसंघात ५५ वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास!!; मदतीवाचून असे किती बळी जाणार??

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २७, २८ सप्‍टेंबर आणि २ ऑक्‍टोबरला झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ९० टक्‍क्‍यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. अशावेळी तातडीने ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र सरकारकडून पंचनामे, सर्वे, पाहणीच्या नावाखाली वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याचे गंभीर परिणाम जिल्ह्यात दिसू लागले आहेत. गेल्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा सहावा बळी गेला आहे. काल, ५ ऑक्‍टोबरला दुपारी पालकमंत्र्यांच्‍याच मतदारसंघात हताश शेतकऱ्याने गळफास घेतला. बबन लक्ष्मण खंदारे (५५, रा. दुसरबीड, ता. सिंदखेड राजा) असे या शेतकऱ्याचे नाव असून, ऐन कापणीच्‍या दिवसांत संपूर्ण पीकच पाण्याखाली गेल्याने ते चिंताग्रस्त होते.

खंदारे यांनी शेतात सोयाबीन आणि उडीद पिकाची पेरणी केली होती. कापणीच्या दिवसांत अतिवृष्टी झाल्याने पीक पाण्याखाली गेले. काल दुपारी शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. किनगाव राजा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बळीराजाने धाडसाने घेण्याची गरज- बुलडाणा लाइव्ह भूमिका
संकटे येत असतात, पण ती पाहून कोलमडून पडण्याऐवजी त्‍याला धाडसाने तोंड देणारा बळीराजा असतो. शेतकऱ्यांनी या संकटातही नवी उभारी घेण्यासाठी संयम ठेवण्याची गरज आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्‍यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव आणण्याची गरज असताना केवळ पाहणी आणि निवेदनबाजी करण्यातच लोकप्रतिनिधी सध्या धन्यता मानत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.