अतुलनीय, अजोड वस्त्र दालन एस 2 के… नावापासून ते कलेक्शन्स सारेच हटके..!

नावापासून ते कलेक्शन्सपर्यंत सर्वच बाबतीत हटके असलेले. जिल्हा मुख्यालयाचे व्यावसायिक वैभव ठरलेले प्रतिष्ठान म्हणजे एस टू के होय. सर्क्यूलर रोडवरील रामनगरमध्ये हे कपड्यांचे भव्य शोरूम आहे. सकाळी ते रात्री उशिरापर्यंत चोखंदळ, स्टँडर्ड ग्राहकांची, कुटुंबाची येथे गर्दी कायम असते. याला कोणताही सिजन अपवाद नाहीये! एस टू के साठी तरी कोणताही ऑफ सिजन नाहीच असे म्हणता येईल… …
 
अतुलनीय, अजोड वस्त्र दालन एस 2 के… नावापासून ते कलेक्शन्स सारेच हटके..!

नावापासून ते कलेक्शन्सपर्यंत सर्वच बाबतीत हटके असलेले. जिल्हा मुख्यालयाचे व्यावसायिक वैभव ठरलेले प्रतिष्ठान म्हणजे एस टू के होय. सर्क्यूलर रोडवरील रामनगरमध्ये हे कपड्यांचे भव्य शोरूम आहे. सकाळी ते रात्री उशिरापर्यंत चोखंदळ, स्टँडर्ड ग्राहकांची, कुटुंबाची येथे गर्दी कायम असते. याला कोणताही सिजन अपवाद नाहीये! एस टू के साठी तरी कोणताही ऑफ सिजन नाहीच असे म्हणता येईल…

अतुलनीय, अजोड वस्त्र दालन एस 2 के… नावापासून ते कलेक्शन्स सारेच हटके..!

भव्य इमारतीत असलेल्या, अजय गजानन भारती यांच्या मालकीच्या या प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य म्हणजे आबाल वृद्धांसाठी ब्रँडेड रेडिमेड कपडे ते आकर्षक साड्या, युवा वर्गाला जागीच खिळवून टाकतील, असे अत्याधुनिक फॅशनचे कपडे होय. यामुळे दैनंदिन वापर, सण उत्सव असो की लग्न आदी मोठे समारंभ असो, कपडे घ्यायचे म्हणजे ते एसटूके मध्येच असा मजेदार नियमच झाला आहे. नोकरीचा विचारही न करता अजय भारती यांनी अवघ्या 22 व्या वर्षी हा व्यवसाय निवडला. आई- वडिलांचे आशीर्वाद होते, परिश्रम करण्याची जिद्द होती. त्यामुळे 1997 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आज मराठमोळ्या माणसाची उज्ज्वल यशोगाथा ठरलीय. आम्ही ग्राहकांचा विश्‍वास जिंकला. त्यांची मनेही जिंकलीत. आज प्रत्येक ग्राहक आमचा कौटुंबिक सदस्य झाल्यासारखा आहे. 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला आगळा उपक्रम राबविण्यात येतो, असे पदवीच्या दुसर्‍या वर्षाला असताना व्यवसाय सुरू करणार्‍या अजय भारती यांनी चर्चेदरम्यान सांगितले. ग्राहक जेव्हा दुकानाचे कौतुक करतो, नवीन ड्रेस घालून आनंद व्यक्त करतो तोच क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय ठरतो, असे ते विनम्रपणे सांगतात. असे ठेवतात कोरोनाला दूर… एस 2 केमध्ये कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेेकोर पालन केले जाते. ग्राहकांना हॅन्ड सॅनिटायझर दिल्यानंतर प्रवेश दिला जातो. कर्मचारीही नियमांचे पालन करतात. कोरोना काळात सामाजिक भानही श्री. भारती यांनी जपले. कोरोनापासून लोकांचा बचाव व्हावा यासाठी सॅनिटायझर, मास्क वाटप केले. विशेष म्हणजे कोरोना काळात दालनातील कर्मचार्‍यांचीही कुटुंबाप्रमाणेच विशेष काळजी श्री. भारती यांनी घेतली.