अत्यावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर; ५ दिवसांत जिल्ह्यात ६८ कारवाया!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अत्यावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि काळाबाजार करणाऱ्यांच्या विरोधात जिल्हाभरात पोलिसांनी कारवायांचे धाडसत्र सुरू केले आहे. अवैध गॅस सिलिंडरचा साठा, हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर तसेच परवानगी नसताना पेट्रोल विकणाऱ्यांच्या विरोधात गेल्या पाच दिवसांत ६८ कारवाया करण्यात आल्या. २६ ते ३० जून दरम्यान केलेल्या या कारवायांत बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ९ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अत्यावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि काळाबाजार करणाऱ्यांच्या विरोधात जिल्हाभरात पोलिसांनी कारवायांचे धाडसत्र सुरू केले आहे. अवैध गॅस सिलिंडरचा साठा, हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर तसेच परवानगी नसताना पेट्रोल विकणाऱ्यांच्‍या विरोधात गेल्या पाच दिवसांत ६८ कारवाया करण्यात आल्या.

२६ ते ३० जून दरम्‍यान केलेल्या या कारवायांत बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ९ कारवाया केल्या आहेत. या ९ कारवायांतून ४ लाख ४० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन स्तरावर करण्यात आलेल्या ५९ कारवायांमध्ये १ लाख ७० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही मोहीम कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे ठाणेदार, कर्मचारी तसेच “एलसीबी’चे सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, पोलीस अंमलदार सुनिल खरात, पंकजकुमार मेहेर, भारत जंगले, गणेश शेळके यांनी पार पडली.