अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर! चिखली शहरातील राऊतवाडी ते नगरपालिका रस्त्याच्या मान्यता विलंबासाठी कारण दाखवा नोटीस बजावणार!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहरातील राऊतवाडी ते नगरपालिकेपर्यंतच्या रस्त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे वर्षभरापासून प्रलंबित असल्याचा मुद्दा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी मांडला असता जिल्ह्याधिकार्यांकडे प्रस्तावच पोहोचला नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. आठ नऊ महिन्यांपासून प्रस्ताव सादर असल्याचे सांगताच पालकमंत्री राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकार्यांनी या कामाबाबत दिरंगाई करणार्या अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून मान्यतेची प्रक्रिया करण्याचे आश्वासन …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहरातील राऊतवाडी ते नगरपालिकेपर्यंतच्या रस्त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे वर्षभरापासून प्रलंबित असल्याचा मुद्दा आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी मांडला असता जिल्ह्याधिकार्‍यांकडे प्रस्तावच पोहोचला नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. आठ नऊ महिन्यांपासून प्रस्ताव सादर असल्याचे सांगताच पालकमंत्री राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकार्‍यांनी या कामाबाबत दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावून मान्यतेची प्रक्रिया करण्याचे आश्‍वासन पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक 25 जानेवारीला झाली. बैठकीला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. चिखली शहरातील राऊतवाडी ते नगरपालिका कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा प्रस्ताव गेल्या 9 महिन्यांपासून पाठविलेला आहे. परंतु अद्यापही त्याला मान्यता देण्यात आलेली नाही. अनेकदा पाठपुरावा करूनही मान्यता देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार, मुख्याधिकारी, नॅशनल हायवे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत या रस्त्याची पाहणी केल्यानंतर प्रस्ताव सादर करण्यात आला. आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळ सुद्धा गेले होते. त्यावेळीसुद्धा या रस्त्याला मान्यता देण्याची मागणी केली होती. मान्यता न दिल्याने हा मुद्दा आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उचलून धरला त्यावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.