अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत दोन दिवसांत निर्णय

शरद पवारांनी मौन सोडले; गृहमंत्र्यांचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार; ज्येष्ठ निवृत्त अधिकार्यामार्फत चौकशीची मागणी मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभसीर असून त्यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही हा सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. तसेच चौकशीबाबतही तेच निर्णय घेतली.तरीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय …
 

शरद पवारांनी मौन सोडले; गृहमंत्र्यांचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार; ज्येष्ठ निवृत्त अधिकार्‍यामार्फत चौकशीची मागणी

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभसीर असून त्यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही हा सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. तसेच चौकशीबाबतही तेच निर्णय घेतली.तरीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
एकूणच प्रकरणावर पवार यांनी मौन सोडले. त्याचवेळी परमबीरसिंग यांनी केले ते केवळ आरोप असून त्याबबत पुरावे नाहीत.हे आरोप गंभीर असल्यामुळे ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या उत्तम निवृत्त अधिकार्‍यामार्फत याची चौकशी व्हायला हवी, असे मत पवार यांनी व्यक्त केले.मुंबईला येण्यापूर्वी ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.गृहमंत्र्यांनी मागणी केलेले १०० कोटी रुपये कोणाला द्यायचे होते, कुणाकडे गेले हे काहीच नमूद केले नाही. वाझे यांना नोकरीत परत घेण्याचा निर्णय हा परमबीरसिंग यांचाच होता. त्यात गृहमंत्र्यांचा सहभाग नव्हता.मनसुख यांची गाडी वाझे यांनी घेतली होती. त्यात त्यांनी स्फोटके ठेवली असल्याचा दावाही पवारांनी केला. दरम्यान पवार मुंबईत आल्याने आता राष्ट्रवादीसह इतर इतर नेत्यांना भेटून याप्रकरणाचा आढावा घेतील.त्यानंतरच देशमुख यांच्या राजीनाम्यावर निर्णय होईल, असे म्हटले जात आहे.