अनैतिक संबंधातून थरार… घरात घुसून विवाहितेला पाजले विष; खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः अनैतिक संबंधाच्या वादातून विवाहितेला घरात घुसून उंदीर मारण्याचे औषध पाजण्यात आले. ही थरारक घटना 3 जुलैला रात्री घडली. विवाहितेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात काल, 6 जुलैला रात्री उशिरा 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळक मैदान भागातील रहिवासी मेहराज खातून …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः अनैतिक संबंधाच्या वादातून विवाहितेला घरात घुसून उंदीर मारण्याचे औषध पाजण्यात आले. ही थरारक घटना 3 जुलैला रात्री घडली. विवाहितेची प्रकृती गंभीर असून, तिच्‍यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात काल, 6 जुलैला रात्री उशिरा 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिळक मैदान भागातील रहिवासी मेहराज खातून युनुसखान (30) हिच्या पतीचे फरजाना परवीन हिच्याशी अनैतिक संबंध होते. यावरून पती- पत्नीत वाद झाला. त्यावेळी पतीने मी फरजाना परवीनशी लग्न केल्याचे सांगितले. मेहराज खातून ही 3 जुलै रात्रीदरम्यान घरी असताना तिचा पती बाहेर गेलेला होता. फरजाना परवीन, अब्दुल जब्बार, रहाना, नजराना, अब्दुल गीस व अब्दुल गौस याची पत्नी असे 6 जण तिच्या घरी आले व “तू घरातून निघून जा’ असे म्हणून वाद घातला. फरजाना परवीन हिने उंदीर मारण्याचे विष ग्लासमध्ये टाकून मेहराज खातून हिला पाजले. त्यावेळी तिने आरडा -ओरड केल्याने शेजाऱ्यांनी धाव घेवून बंद असलेले दार तोडले.

शेजारी आल्याने सर्व आरोपी तेथून पळून गेले. घडलेला प्रकार मेहराज खातून हिने पतीला दोन दिवस सांगितलाच नाही. 5 जलै रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने तिला प्रथम खासगी रुग्णालय व नंतर सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. तेथे पोलिसांनी तिचा जबाब घेतला असता मेहराज खातून हिने सर्व हकीकत सांगितली. यावरून शहर पोलिसांनी फरजाना परवीन, अब्दुल जब्बार, रेहाना, नजराना, अब्दुल गौस व त्याची पत्नी अशा 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.