“…अन्यथा तुझ्या नवऱ्याला दुसरी बायको करून देऊ…’; विवाहितेचा छळ मांडला, पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, मोताळा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरवरून मंडपाचा व्यवसाय करण्यासाठी ५० हजार रुपये आण अन्यथा तुझ्या नवऱ्याला दुसरी बायको करून देऊ, अशी धमकी देत २४ वर्षीय विवाहितेचा छळ मांडण्यात आला. माकोडी (ता. मोताळा) येथील विवाहितेच्या तक्रारीवरून धामोडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध धामणगाव बढे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती ज्ञानेश्वर पांडुरंग …
 
“…अन्यथा तुझ्या नवऱ्याला दुसरी बायको करून देऊ…’; विवाहितेचा छळ मांडला, पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, मोताळा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरवरून मंडपाचा व्यवसाय करण्यासाठी ५० हजार रुपये आण अन्यथा तुझ्या नवऱ्याला दुसरी बायको करून देऊ, अशी धमकी देत २४ वर्षीय विवाहितेचा छळ मांडण्यात आला. माकोडी (ता. मोताळा) येथील विवाहितेच्‍या तक्रारीवरून धामोडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध धामणगाव बढे पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

पती ज्ञानेश्वर पांडुरंग वाघ (२८), सासरे पांडुरंग दिगांबर वाघ (५५), सासू बेबाबाई पांडुरंग वाघ (५१), दीर दिवाकर पांडुरंग वाघ (२४), नणंद मोहिनी संदीप चव्हाण (२८, रा. जळगाव खानदेश), नणंद सौ. मीरा विष्णू सोनोने (३०, रा. खेर्डी ता. रावेर), नणंद सौ. अनिता राजू चव्हाण (३२, रा. पाचोरा) अशी आरोपींची नावे आहेत. सौ. रेश्मा ज्ञानेश्वर वाघ या विवाहितेने तक्रार दिली, की लग्नानंतर पती व सासरच्यांनी एक-दीड वर्ष चांगले वागविले. नंतर मात्र छोट्या मोठ्या कारणावरून तिचा मानसिक, शारीरिक छळ सुरू केला. माहेरवरून ५० हजार रुपये मंडपाचा धंदा टाकण्यासाठी घेऊन ये नाही तर तुझ्या नवऱ्याला दुसरी बायको करून देतो, असे म्हणून सासरच्यांनी शिविगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्‍यामुळे रेश्माने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. बुलडाण्याच्‍या महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षानेही गुन्‍हा दाखल करण्याचे पत्र दिले. त्‍यामुळे पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.